महाराष्ट्रासाठी आपला आवाज

मुख्यमंत्र्यांना ई-मेल

प्रति
cm@maharashtra.gov.in
विषय
मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाची मुदतवाढ रद्द करण्याबाबत विनंती
मा. मुख्यमंत्री साहेब,

सविनय नमस्कार.

आपण परप्रांतियांना मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयासाठी दिलेल्या मुदतीत पुन्हा वाढ केली आहे. यापूर्वीही त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आपल्या या लवचिक भूमिकेमुळे महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावला जात आहे.

मराठी भाषा अवगत असणे हा नियम सुरुवातीपासूनच लागू असताना संबंधित व्यक्तींना परवाने मिळालेच कसे, हा गंभीर प्रश्न निर्माण होतो. जर नियमांचे उल्लंघन करून परवाने देण्यात आले असतील, तर संबंधित अधिकारी आणि परवाना घेणाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र, कारवाई करण्याऐवजी वारंवार मुदतवाढ दिल्याने सर्वसामान्य मराठी जनतेमध्ये चुकीचा संदेश जात आहे.

मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाबाबत आम्हाला आपल्या सरकारकडून ठोस आणि योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. कृपया या विषयाकडे गांभीर्याने पाहून मराठी भाषेचा सन्मान आणि महाराष्ट्रधर्म जपण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी.

आपण मराठी जनतेच्या भावना समजून घेऊन सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे.

जय महाराष्ट्र!

आपला,
मराठी माणूस
॥ जय महाराष्ट्र ॥